Tuesday, July 14, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्रया जिल्ह्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; भारतीय हवामान विभागाने दिला इशारा

या जिल्ह्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; भारतीय हवामान विभागाने दिला इशारा

मुंबई | प्रतिनिधी 

गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस असून आज (दि. 9 सप्टेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

राज्यातील गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!