कुडाळ येथे मतदान मशीन संदर्भात करण्यात आली जनजागृती

0

कुडाळ | प्रतिनिधी

मतदारांमध्ये मतदान करण्यात येणाऱ्या मशीन संदर्भात जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कुडाळ तहसील कार्यालय येथे आज (बुधवार) मतदान मशीन संदर्भात जनजागृती करण्यात आली.

निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी तसेच त्यांना प्रशिक्षित करावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे मतदान मशीन संदर्भात अनेक अफवा निर्माण केल्या जात आहेत त्यामुळे मतदारांना मशीन संदर्भात जनजागृती करण्यासाठी बूथ निहाय तसेच शासकीय कार्यालयांमध्ये मतदान करण्यात येणाऱ्या मशीन ठेवून तेथे जनजागृती करून मतदारांना प्रशिक्षित केले जात आहेत कुडाळ तहसील कार्यालय येथे हा उपक्रम राबविण्यात आला.