Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीखारेपाटण नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

खारेपाटण नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत

काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर मी तुमची ढाल बनून उभा राहणार;आमदार नितेश राणे 

कणकवली | प्रतिनिधी 

कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी “जय हिंद जय भीम..” चा नारा दिला होता. तसेच आरक्षण आपल्या हक्काचे आहे. ते कोणाला रद्द करता येणार नाही. त्यामुळे आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून कणकवली तालुक्यातील नडगिवे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी मनोहर पगारे, गणेश जाधव, कीर्तिकांत जाधव, दीपक पगारे, यशवंत पगारे, बाबल्या जाधव, अपूर्वा पगारे, विनय पगारे , तन्मय पगारे, हरेश पगारे, रोहित पगारे, सुनील जाधव, हेमंत जाधव, दिनेश पगारे, यशवंत जाधव, अनंत पगारे, सदाशिव पगारे, यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्ष प्रवेश केला.

यावेळी उपस्थित दिलीप तळेकर, बाळा जठार, सरपंच प्राची इस्वलकर रमाकांत राऊत,सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, सुधीर कुबल, राजू वरूनकर उज्वला चिके, अमित मांजरेकर किरण करले, जयदीप देसाई आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!