Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळमहाराष्ट्राचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश...

महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपेश बिडीये मित्र मंडळ यांच्या वतीने झाराप येथील जीवनदान विशेष शाळेमध्ये धान्य व वृक्षाचे वाटप

कुडाळ | प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपेश बिडीये मित्र मंडळ यांच्या वतीने झाराप येथील जीवनदान विशेष शाळेमध्ये धान्य व वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी येथील विद्यार्थ्यांच्या हस्ते पालकमंत्री नितेश राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला रुपेश बिडीये मित्र मंडळाच्या वतीने झारा येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी जीवनदान विशेष शाळेला धान्य वाटप करण्यात आले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक झाड आईसाठी या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, रुपेश बिडीये, अशोक उर्फ बंड्या कंदुरकर, संतोष माणगावकर, भूषण म्हाडगुत, परेश धुरी, रणजीत जाधव, लक्ष्मण सूळ, प्रथमेश पेंटर, पोलीस कर्मचारी हरेश पाटील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!