Friday, August 7, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकण*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून कामाला लागा*

*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून कामाला लागा*

*मा.खा.विनायक राऊत,मा.आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांचे आवाहन* 

*ओरोस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाकार्यकारीणीची बैठक संपन्न* 

      

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी त्याला खचून न जाता पक्ष संघटना वाढीचे काम सुरु ठेवा. जनतेची फसवणूक करून विरोधकांनी हा विजय मिळविला आहे. केंद्रात, राज्यात भाजप महायुतीची सत्ता आहे मात्र तरीही जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे. त्यामुळे जनतेच्या समस्यांवर आवाज उठविण्याचे काम आपण केले पाहिजे. बाळासाहेबांनी आणि उद्धवजींनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगसेवक, आमदार, खासदार अशा मोठं मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. इतर पक्षात मात्र आयात केलेल्या प्रस्थापितांना संधी दिली जाते. लवकरच जिल्हापरिषद, पंचायत समिती,नगरपंचायत, नगरपालिका निवडणुका होणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून कामाला लागा असे आवाहन शिवसेना नेते, मा. खा. विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले. 

 

          शिवसेना नेते, मा. खा. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाकार्यकारीणीची बैठक रविवारी ओरोस शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

        याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कोकण उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब,जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, हरी खोबरेकर,कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, मंगेश लोके, नंदू शिंदे, जयेश नर, बाळू परब,गणेश गवस,चंद्रकांत कासार,सुकन्या नरसुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!