कुडाळ | प्रतिनिधी
मांडकुली येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये चोरी केल्याप्रकरणी मांडकुली पेडणेकरवाडी येथील मुकेश मनोहर खवणेकर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मांडकुली येथील प्राथमिक शाळेमध्ये असलेले साहित्य चोरीला गेले होते. ही चोरी स्थानिक व्यक्तीने केले असावी असा संशय पोलिसांना होता दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने या चोरट्याचा माग काढून त्याला पकडले याच गावांमधील पेडणेकरवाडी मध्ये राहणारा ३१ वर्षीय मुकेश मनोहर खवणेकर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडले त्याच्याजवळ चौकशी केला असता त्यांनी ही चोरी केल्याचे कबूल केले पकडल्यानंतर कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साटम, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार डॉमिनिंग डिसोजा, सदानंद राणे यांनी केली.


