सिंधुदुर्ग, दि. २4 सप्टेंबर २०२६
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०27 पर्यंत कुष्ठरोग संक्रमण शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात Focused Leprosy Campaign (FLC) व Contact Survey राबविण्यात येत आहे. ही मोहीम दि. १६ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
समाजामध्ये लपलेले कुष्ठरोग रुग्ण वेळेत शोधणे, निदान झालेल्या रुग्णांच्या निकट सहवासितांची तपासणी करणे, विशेषतः बालकांमधील कुष्ठरोगाचे प्रमाण तसेच MB कुष्ठरुग्ण व विकृती असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी करणे, यासाठी या मोहिमेवर विशेष भर देण्यात आला आहे.
*मागील पाच वर्षांतील रुग्णांच्या सहवासितांची तपासणी*
मागील पाच वर्षांत, म्हणजे सन २०२१ पासून निदान झालेल्या कुष्ठरोग रुग्णांच्या सहवासितांचे Contact Survey करण्यात येणार आहे. तसेच FLC अंतर्गत विशेष जोखीम असलेल्या भागांमध्ये आणि गटांमध्ये लक्ष केंद्रित करून सर्वेक्षण केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील विशेष सर्वेक्षण
जिल्ह्यात यावर्षी NLEP Zero Leprosy Village Survey घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोग आढळलेल्या गावांमध्ये Focused Leprosy Campaign राबविण्यात येणार आहे. संबंधित गावांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणाची माहिती नियमितपणे Google Sheet मध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे.
*शहरी भागात २०० घरांचे सर्वेक्षण*
शहरी भागात कणकवली, मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ला येथील कुष्ठरोग वास्तव्यास असलेल्या भागांमध्ये विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या भागात शेजारील किमान २०० घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
*या गटांवर विशेष लक्ष*
♦️Focused Leprosy Campaign अंतर्गत पुढील बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे—
♦️बालकांमध्ये कुष्ठरोग आढळण्याची शक्यता असलेली क्षेत्रे
♦️MB कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील सहवासित
♦️मागील ५ वर्षांत कुष्ठरोग आढळलेल्या कुटुंबातील सहवासित
♦️Gr-I व Gr-II विकृती असलेल्या कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील सहवासित
♦️कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेली गावे, पाडे व वॉर्ड
♦️PEP देण्याबाबत कार्यवाही
*सर्वेक्षणादरम्यान कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींना PEP* (Post-Exposure Prophylaxis) देण्यात आली आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. PEP न घेतलेल्या पात्र सहवासितांची वैद्यकीय तपासणी करून नियमानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात येणार आहेत.
*कुष्ठरोगाचे लवकर निदान—वेळीच उपचार*
कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास किंवा कुष्ठरोगी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे विकृती टाळण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
*जिल्हा आरोग्य अधिकारी*,
*जिल्हा परिषद सिंधुदुर्ग*
*सहाय्यक संचालक कुष्ठरोग सिंधुदुर्ग*


