महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांचा होणार नागरी सत्कार

0

रविवार ६ ऑक्टोंबर रोजी कुडाळ येथे होणार सत्कार 

सत्काराला खासदार नारायण राणे यांच्यासह राजकीय नेते राहणार उपस्थित

कुडाळ | प्रतिनिधी 

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ॲड. संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार सर्व राजकीय, सामाजिक संस्थांच्या वतीने रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे करण्याचे ठरले असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला पहिल्यांदाच बहुमान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला अमित सामंत, ॲड. अजित भणगे, ॲड. अमोल सामंत, श्रीनिवास नाईक, विशाल देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, गजानन कांदळगावकर, संतोष शिरसाट, ॲड. आनंद गवंडे, ॲड. पै आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड. विवेक मांडकुलकर यांनी सांगितले की, या नागरी सत्काराला खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे तसेच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे जयंत जय भावे, उपाध्यक्ष सुदीप पासबोला, गजानन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असे त्यांनी सांगितले यावेळी जेष्ठ वकील अजित भणगे यांनी सांगितले की, ही संघटना स्थापन झाल्यापासून या जिल्ह्याला असा बहुमान मिळाला नव्हता. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे मिळून ८०० सदस्य आहेत आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या सदस्यांची संख्या २५ असून त्यामधून अध्यक्ष निवडला जातो. ज्यामध्ये कोकणचे वकील नाहीत .तरीसुद्धा ॲड. संग्राम देसाई हे अध्यक्षपदी निवडून आले ते केवळ त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे असे त्यांनी सांगून पहिल्यांदाच वेल्फेअरसाठी मुंबई येथे त्यांनी जागा मिळवून दिली आहे वकिलांसाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे. आम्ही कधी वकिलांसाठी कार्यक्रम पाहिले नाहीत पण त्यांनी त्यांच्या कालावधीत हे कार्यक्रम घडवून आणले असे त्यांनी सांगितले. तर डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले की, कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी संग्राम देसाई यांनी प्रयत्न केले सर्व सामान्यांसाठी आणि वकिलांसाठी नेहमी धडपडणाऱ्या अशा आसामीचा सत्कार होणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्ष रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागातून या पदापर्यंत कोणीही गेलं नव्हतं ते या पदापर्यंत पोहोचले आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. तर जिल्हा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर यांनी सांगितले की, कमी वयात हे त्यांनी यश प्राप्त केले आहे गेली २८ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून नागरी सत्कार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली त्यामुळे हा सत्कार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.