Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात खारेपाटण येथे स्वागत ; ५१ जेसीबी, २...

मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात खारेपाटण येथे स्वागत ; ५१ जेसीबी, २ क्रेनच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावर केली पुष्पवृष्टी 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भव्यदिव्य स्वागत पाहून मंत्री नितेश राणे झाले भावूक

ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी

खारेपाटण | प्रतिनिधी 

तब्बल ५१ जेसीबी आणि २ क्रेन च्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नाम. नितेश राणे यांचे सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नाम. नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला होता. नाम. नितेश राणे यांच्या आगमनाने कार्यकर्त्यां बरोबरच जनमानसांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी कार्यकर्ते जोरदार घोषणा देत ,नितेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..,जय श्रीराम,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला. मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ.अजित गोगटे, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे,अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, संतोष कानडे, शिवसेना उप नेते संजय आग्रे,भाजप जिल्हा सचिव संदीप साटम,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,माजी नगराध्यक्ष समिर नलावडे, बॅंक संचालक समीर सावंत,बाळा जठार, स्वप्नील चिंदरकर,भालचंद्र साठे, संदीप साटम, बंड्या नारकर, रमाकांत राऊत, भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, तन्वी मोदी, प्राची इस्वलकर, हनुमंत तळेकर, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे,संजय कामतेकर, महेश सावंत, शिशिर परुळेकर, सोनू सावंत ,संजय देसाई, राजू जठार, संदीप सावंत, महेश गुरव, लक्ष्मण घाडीगावकर,बबन शिंदे, दामू सावंत, जयेंद्र रावराणे, बबन शिंदे,समीर प्रभू गावकर, प्रदिप रावराणे, शामा दळवी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्र दीपक स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढे भव्यदिव्य स्वागत अनुभवण्याचा मान ना.नितेश राणे यांना प्राप्त झाला. खारेपाटण येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सकाळपासुनच हजेरी लावली होती. दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातुन भव्य पुष्पहार ठेवण्यात आले होते. पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल ५१ जेसीबी सज्ज झाले होते. मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे आगमन झाल्यानंतर जोरदारपणे घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतीषबाजी करत, ढोल पथकांच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले. यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्य मंचकाच्यादिशेने जात असताना ५१ जेसीबीच्या माध्यमातुन पुष्पवृष्टी करण्यात आल्याने संपुर्ण वातावरण भारावुन गेले होते. एखाद्या राजकीय नेत्याची एवढ्या भव्य-दिव्य पद्धतीने स्वागत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. 

शासकीय स्वागत

ना. नितेश राणे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणुन प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असल्याने शासकीय रिवाजानुसार खारेपाटण येथे प्रथम कणकवलीचे तहसिलदार दिक्षांत देशपांडे तसेच कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप यांनी ना. नितेश राणे यांचे स्वागत केले. 

स्वागतासाठी गर्दी

ना. नितेश राणे हे पहिल्यांदाच मंत्री म्हणुन जिल्ह्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पारावार राहीला नव्हता. यावेळी शासकीय स्वागत झाल्यानंतर ना. नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यासाठी त्याचप्रमाणे मंत्री नितेश राणे यांच्या समवेत आपला फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. नाम. नितेश राणे यांनी मंचकावरुन स्वागताचा स्विकार केला.

गाड्यांचा मोठा ताफा

ना. नितेश राणे हे राजापुर येथे हेलीकॉप्टरने दाखल झाले. यावेळी राजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्यासह संदिप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गाड्यांचा मोठा ताफा तैनात होता. राजापुर येथे स्वागत स्विकारल्यानंतर नाम. नितेश राणे हे खारेपाटण येथे दाखल झाले. 

नाम. नितेश राणेंच्या स्वागताचे भव्यदिव्य नियोजन

मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दाखल होणार असल्याने खारेपाटण येथे भव्यदिव्य स्वागताचे नियोजन विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे, कणकवली तालुका तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, संजय देसाई, बाळा जठार यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी केले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!