सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
काजूच्या बोंडाला चांगला भाव गोवा राज्यात मिळतो, त्यापासून विविध प्रकारचे मद्यार्क बनविले जाते. मात्र गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बोंडावर प्रकिया उद्योग निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली नाही. दरम्यान सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून बोंडावर प्रकिया उद्योग निर्माण करण्यासाठी सिंधूरत्न समितीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर सह पाच जण ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.
काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी ब्राझील चा ब्रँड वापरण्यासाठी सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ब्राझीलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काजू बोंडूपासून तयार करण्यात येणाऱ्या
उत्पादनांचा अभ्यास करण्यासाठी सिंधू रत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदरसिंह, दापोली कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी, आणि शास्त्रज्ञ डॉ. मंदार खानविलकर या पाच जणांची टीम ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यावर गेली आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी सिंधू रत्न समृद्धी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात विकास व्हावा रोजगार उपलब्ध व्हावा आणि दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंधु रत्न योजनेच्या माध्यमातून ब्राझील अभ्यास दौरा करून काजू बोंडे प्रक्रिया उद्योगावर मार्ग काढण्यात येणार आहे सरकारच्या मान्यतेनंतर ब्राझील दौऱ्यावर पाच जणांची टीम २३ फेब्रुवारी ते ३ मार्च त्या कालावधीसाठी गेली आहे.
