पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन 

कुडाळ | प्रतिनिधी 

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा चौथा पुण्यतिथी उत्सव सोहळा १५ आणि १६ मे हे २ दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 १५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता काकड आरतीने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर समाधी पूजन, अभिषेक, दुपारी महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ नंतर भजन आणि गायन कार्यक्रम, सायंकाळी सांजआरती, रात्री ८ ते ९ महाप्रसाद आणि कीर्तन, असे कार्यक्रम होणार आहेत. 

 १६ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता काकड आरतीपासून कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. या अंतर्गत समाधी पूजन, अभिषेक, प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज समाधी स्थानी नामस्मरण आणि पूजन, दुपारी १२ वाजता कर्णबधीरांना विनामुल्य कर्णयंत्राचे वितरण, अपंगांना कृत्रिम जयपूर फूटचे वितरण, कर्करोगग्रस्त १५० रुग्णांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण, दुपारी १ नंतर महाप्रसाद, गायन, भजन, दिंडीचे आगमन, शास्त्रीय गायन, सांजआरती, भजन, रात्री ९ वाजता राधानृत्य, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘सोनाली केबल व्हिजन’, या यु ट्यूब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या निमित्ताने समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळीच्या अध्यक्षा प.पू. संगिता (बाईमा) विनायक (अण्णा) राऊळ आणि सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी आणि विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.