या वर्षीचा कुडाळ तालुक्याचा १० वी चा निकाल ९९.१४% लागला

कुडाळ हायस्कूलची चैतन्या रुपेश सावंत हिला १०० टक्के मिळवून तालुक्यात पहिली आली…

 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यामधून दहावीच्या परीक्षेला १ हजार ६४२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ हजार ६२८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा ९९.१४ टक्के एवढा निकाल लागला असून कुडाळ हायस्कूल कुडाळची चैतन्या रुपेश सावंत याला १०० टक्के गुण मिळाले आहेत ती तालुक्यामध्ये अव्वल आली आहे.

कुडाळ हायस्कूलचा यावर्षीचा दहावीचा निकाल ९८. १६ टक्के एवढा लागला असून प्रथम क्रमांक चैतन्या रुपेश सावंत हिने पटकावला असून त्याला १०० टक्के गुण मिळाले आहेत द्वितीय क्रमांक स्मितेश विनोद कडोलकर ९९.४० टक्के तर तृतीय क्रमांक निधी भास्कर सावंत ९९ टक्के, रिया राकेश पाटणकर ९९ टक्के गुण मिळवून यांनी यश प्राप्त केले आहे.

प्रशालेतून २१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गणित विषयात १०० पैकी १०० गुण स्मितेश विनोद कडोलकर, विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण स्मितेश विनोद कडोलकर व निधी भास्कर सावंत हिने मिळवले आहेत तर संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण चैतन्या सावंत, स्मितेश कडोलकर, निधी सावंत, प्रथम सावंत, चारुता तुळसकर, सार्थक कदम, शुभम पिंगुळकर, श्रेया सावंत, अथर्व आजगावकर, चिन्मय पवार, ओम वारंग, श्रावणी धामापूरकर, प्रणिता नाईक यांनी यश प्राप्त केले आहे तर ९० व ९० टक्के पेक्षा जास्त गुण ३० विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे.

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण चा दहावीचा निकाल १०० टक्के

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण  चा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून कु.निखिल मिलिंद चव्हाण हा ९०. ६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे. कु.हर्षदा संजय टुंबरे हिला ८५. ६० टक्के तर कु.कीर्ती मनीज बर्वे ८४. ८० टक्के गुण मिळाले असून त्यांना विद्यालयात अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळाला आहे.

यावर्षी प्रशालेतून परीक्षेला एकूण २६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्रविण्य श्रेणी मध्ये ११ विध्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये १३ विध्यार्थी द्वितीय श्रेणि मध्ये १ तर उत्तीर्ण श्रेणी मध्ये १ विध्यार्थी असा निकाल लागला आहे. सर्व उत्तीर्ण विदर्थ्यांचे प्रशाला शिक्षक शिक्षण संस्था यांच्यावतीने अभीनंदन करण्यात आले.

आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय

आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एसएससी परीक्षेमध्ये नयन विश्वनाथ सावंत याला ८१.४० टक्के गुण मिळवून तो प्रशालेत प्रथम आला आहे तर द्वितीय यशस्वी सुधीर सावंत हिला ७९.६० टक्के तर तृतीय क्रमांक रिया संतोष दळवी हिने ७७.८० टक्के गुण मिळवून यांनी यश मिळवले आहे.

डीगस माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के

डीगस माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे यामध्ये प्रथम वैभवी संतोष पवार ८८.२० टक्के, द्वितीय साक्षी अनंत सावंत ८४.२० टक्के, तृतीय विश्वास रमेश आंगणे ८१.४० टक्के गुण मिळवले. १२ विद्यार्थ्यांपैकी विशेष श्रेणी ७ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अमरसेन सावंत, सचिव भूपतसेन सावंत, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, प्रभारी मुख्याध्यापक सौ अनुजा सावंत व सर्व संस्था चालक, शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

हिर्लोक शिवाजी विद्यालयाचा १०० टक्के निकाल

हिर्लोक शिवाजी विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असून प्रथम आर्यन श्रीकृष्ण घाडीगावकर ९२.२० टक्के, द्वितीय गार्गी रवींद्र सावंत ९१.२० टक्के, तृतीय सिद्धेश सुधाकर नाईक ८८.८० टक्के गुण मिळवून अव्वल आले आहेत प्रशालेमध्ये विशेष प्राविण्य २५, प्रथम श्रेणी २१, द्वितीय श्रेणी १२, तृतीय श्रेणी १ असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष उदय सावंत, सचिव दीपक नारकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत नाईक, उपाध्यक्ष गुरुदास कुसगावकर, खजिनदार बाजीराव झेंडे, सहसचिव पंढरीनाथ सावंत, मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत सर्व संचालक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.