विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यांच्या पॅनल विरोधात चंद्रशेखर जोशी आणी बाळा आगलावे यांच्या प्रत्येकी दोन पॅनलची काटे की टक्कर..
९ जांगासाठी श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास विरूद्ध शिक्षण अग्रणी पॅनल विरूद्ध श्री.वासुदेवानंद सरस्वती पॅनल यासह तीन पॅनलसह दोन अपक्ष उमेदवार रिंगणात…
९ जांगासाठी २९ उमेदवार रिंगणात
विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यांच्यासह पाच विद्यमान संचालक रिंगणात
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवडणुकीकडे लक्ष्य
कुडाळ:माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक 31 मे रोजी होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलशी थेट लढत विद्यमान संचालक चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलशी तसेच बाळा आगलावे, विजय पालकर, जोसेफ डॉटन्ट, विनोद चव्हाण, पांडू सावंत, एकनाथ केसरकर यांच्या श्री.वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलशी होत आहे. या तिरंगी लढती बरोबर दोन अपक्षांनी शड्डू ठोकला असून संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगतदार निवडणूक पार पडत आहे माणगाव हायस्कूलच्या आतापर्यंतच्या इतिहासाच्या काळात माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव या संस्थेची गेली कित्येक वर्षे बिनविरोध निवड झाली होती.मात्र पी. टी. आर मिळण्याच्या दृष्टीने धर्मादाय आयुक्त यांनी थेट निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर धर्मादायक आयुक्ताच्या आदेशानुसार ही निवडणूक संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी असून श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलचे प्रमुख आहेत. या पॅनलमध्ये सगुण धुरी, साईनाथ नार्वेकर, बाली नानचे,बाळा जोशी हे चार विद्यमान संचालक तर दीपक सावंत, मनोहर साटम,मंगेश उर्फ राजू रांगणेकर,मेघशाम पावसकर,जयंत कुबल असे ९ उमेदवार असून या पॅनलचे चिन्ह कपबशी असून हे नऊहीजण मैदानात उतरले आहेत..
दुसरे पॅनल शिक्षण अग्रणी पॅनल असून विद्यमान संचालक श्री.चंद्रशेखर शिवराम जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल मैदानात आहे.या पॅनलमध्ये श्री.चंद्रशेखर शिवराम जोशीश्री.विश्वनाथ प्रभाकर परूळेकर,श्री.योगेश मनोहर फणसळकर, श्री.देवेंद्र काशिनाथ धुरी, श्री.विजय वसंत भिसे, श्री.विष्णू बापू कांडरकर,श्री.सुरबा रामचंद्र सावंत,श्री.प्रशांत आत्माराम सावंत,श्री.नरेंद्र कृष्णा लाड हे ९ उमेदवार बैलगाडी निशाणीवर लढत आहेत.
तर तिसरे पॅनल माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल उर्फ बाळा हरी आगलावे, विजय पालकर, जोसेफ डॉटन्ट, विनोद चव्हाण, पांडू सावंत, एकनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली श्री.वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनल लढत असून या पॅनल मध्ये विठ्ठल उर्फ बाळा हरी आगलावे, विजय पालकर, जोसेफ डॉटन्ट, विनोद चव्हाण, पांडू सावंत, एकनाथ केसरकर,कमलाकर धुरी,अरूण म्हाडगुत,श्रीमती सुभानराव भोसले असे ९ उमेदवार आंबा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत….तर विजय केसरकर आणी नारायण कदम हे दोन अपक्ष उमेदवार आहेत.९ जांगासाठी तीन पॅनल आणी दोन अपक्ष मिळून एकुण २९ उमेदवार रिंगणात आहेत.
दिनांक ३१ मे २०२५ श्री वा.स. विद्यालय, माणगांव (माणगांव हायस्कूल) येथील मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते पाच यावेळेत मतदान होणार असून लगेजच सहानंतर मतमोजणी होणार आहे.
विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यासह सत्ताधारी पाच संचालक नशीब आजमावत आहेत.तर विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यांच्या पॅनल विरोधात विद्यमान संचालक श्री.चंद्रशेखर शिवराम जोशी यांनी विरोधी शिक्षण अग्रणी पॅनल काढत आणी विद्यमान सचिव एकनाथ केसरकर यांनी श्री.वासुदेवानंद सरस्वती रिवर्तन पॅनल मध्ये उडी घेत या दोघांनी शड्डू ठोकला आहे.तर श्री.वासुदेवानंद सरस्वती
परिवर्तन पॅनलने विठ्ठल उर्फ बाळा हरी आगलावे, विजय नाना पालकर, जोसेफ पिटर डॉटन्ट, विनोद बाबू चव्हाण, विठ्ठल (पांडू) भिवा सावंत, एकनाथ कृष्णा केसरकर,कमलाकर गणेश धुरी,अरूण सिताराम म्हाडगुत,श्रीमती मंगला सुभानराव(किरण)भोसले यासारखे सात निवृत्त अधिकारी,एक माजी सरपंच आणी एक पत्रकार असे ९ ही उच्चशिक्षित आणी उच्चविद्याविभूषित उमेदवार दिल्याचा दवा करत परिवर्तन निश्चित असल्यचा दावा केला आहे.तर चंद्रशेखर जोशी यांनी परिवर्तन अटळ असल्यचे म्हणत आपल्य पॅनलच्या विजयाचा दावा केला आहे. तर पुन्ह आपणच बाजी मारू असा दावा सगुण धुरी यांनी केला आहे….अंदाजे ७५० सभासद मतदार कोणाला निवडन देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागून राहिले आहे …
