कुडाळ | प्रतिनिधी
पिंगुळी गुढीपूर येथे युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सांगली जत येथील यश ऐनापुरे व अमरीश रायनवर या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहे. याप्रकरणी गंभीर जखमी असलेल्या पंकज मसगे याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे.
पिंगुळी येथील उमेश गंगावणे व पंकज रणशूर हे दोघेजण मयेकर यांच्या दुकानावरून आपल्या घरी जात असताना सर्विस रोड येथे तीन इसम रस्त्यावर वेडे वाकडे चालत होते म्हणून त्यांनी त्यांना रस्त्याने सरळ चला असे सांगितले त्यावेळी एकाने गंगावणे व रणशूर यांना शिवीगाळ केली आणि आपल्या वेलकम हॉटेल जवळ असलेल्या रूममध्ये बोलावले हे दोघेही त्या ठिकाणी गेले त्यावेळी या दोघांनी घराचे दरवाजे व खिडक्या बंद करून या दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. नंतर उमेश गंगावणे यांनी सागर रणसिंग यांना फोन लावून आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितले हे सांगितल्यानंतर वाडीतील अनेक जण त्या रूमच्या शेजारी आले मात्र दरवाजा काही उघडलं नाही या रूमच्या खिडकीच्या काचा फोडून बघण्यात आले त्यावेळी पंकज रणशूर याला खिडकीच्या फुटलेल्या काचांनी मारण्याचा प्रयत्न करत होते अखेर त्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी दरवाजा फोडून आत गेल्यावर पंकज मसगे यांच्या डोकीवर यश ऐनापुरे याने फावडे मारले तो गंभीर जखमी झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि सर्वांना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान यश ऐनापुरे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की रस्त्यावर वाद मिटल्यानंतर आपल्या रूमवर गंगावणे, मसगे, रणशूर हे आले आणि आम्हाला मारहाण केली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.


